Pimple Saudagar : कार व दुचाकीच्या अपघातात महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे कारने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना 8 जानेवारी रोजी सकाळी सव्वादहा वाजता विश्वशांती कॉलनी, पिके चौक पिंपळे सौदागर येथे घडली.

राजेंद्र लक्ष्मण शिंगटे (वय 42, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 30) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 17/एजे 4103 क्रमांकाच्या कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari News : एटीएमची अदलाबदल करत 49 हजार लुबाडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून कार भरधाव वेगात चालवली. फिर्यादी यांच्या पत्नी (वय 38) दुचाकीवरून जात असताना आरोपीने (Pimple Saudagar) फिर्यादींच्या पत्नीच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यानंतर फिर्यादीच्या पत्नीला गाडीसह फरफटत नेऊन जखमी केले. यामध्ये दुचाकीचे नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.