Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथून कोयत्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने एका तरुणाला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि.17) दुपारी पावणे दोन वाजता (Pimple Saudagar) पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात करण्यात आली.

 

अभिषेक भगवान मोहिते (वय 21, रा. पिंपळे सौदागर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Chinchwad News : लांब पल्ल्यांच्या गाड्यांना चिंचवड स्थानकात थांबा द्यावा – रेल्वे प्रवासी संघ

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील स्वराज चौकात एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. (Pimple Saudagar) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून अभिषेक याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 250 रुपये किमतीचा एक कोयता आढळून आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.