Pimple Saudagar : महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अठरा कोरोना योद्ध्यांचा सन्मान

Eighteen Corona Warriors honored with Mayor Muralidhar Mohol: महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अठरा कोरोना योद्ध्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या काळात समाजातील तळागाळातील गरजवंतांना औषधे, अन्नधान्य, जेवण त्याचबरोबर इतर जीवनाश्यक वस्तूंची सेवा पुरविणाऱ्या अठरा कोरोना योद्ध्यांचा आषाढी एकादशीच्या दिवशी ( दि.1) सन्मान करण्यात आला.

यावेळी पुणे मनपाचे महापौर मुरलीधर मोहोळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, नगरसेविका लक्ष्मी दुधान, माजी नगरसेवक बंडू केमसे, प्रहार संघटनेचे उमेश महाडिक, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, डॉ. हेमा ठिगळे, वारकरी सेवक विजय बराटे, सामाजिक कार्यकर्ते अतुल दौंडकर , खंडू चिंचवडे, विजय खळदकर, आंतरराष्ट्रीय मानव अधिकार नियंत्रण संस्था अध्यक्ष सम्राट खराटे, उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे , नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानचे संस्थापक महेश स्वामी, संदीप जोशी, योगेश जाधव, मंथन फाउंडेशनच्या आशा भट व उद्योजक संतोष बारणे यांचा गौरव करण्यात आला.

तुलसी वृंदावन, सन्मानपत्र, वारकरी उपरणे, असे या सन्मानाचे स्वरूप होते. युवा कीर्तनकार ह.भ.प ऋषिकेश महाराज चोरगे, ह.भ.प विजय बोत्रे, ह.भ.प सुनील म्होकर यांच्यावतीने हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कीर्तनकार हभप ऋषिकेश महाराज चोरगे म्हणाले, आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाचे काही तरी देणे लागतो . यासाठी जनता कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली असताना त्यांच्यासाठी काही तरी करण्याची भावना मनात ठेवत ह्या कोरोना योद्ध्यांनी मोलाचे कार्य केले.

त्यांच्या या कामाला सलाम करत कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारणे हे आपले कर्तव्य समजत आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी यांचा सन्मान आम्ही करीत असल्याची भावना चोरगे यांनी व्यक्त केली.

विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. संजय भिसे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.