Pimple Saudagr : नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने मूर्तीदान संकलनात 13 हजार 720 गणेशमूर्तीचे संकलन

एमपीसी न्यूज – पवना नदी प्रदूषण (Pimple Saudagr) टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्ती दान हा उपक्रम राबविला. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. 13 हजार 720 गणेशमूर्तीचे संकलन झाले.

मागील 5 वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर,परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे. दीड दिवसांचे ते 10 दिवसांचे गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित न करता, ते दान करण्याचे आवाहन माजी नगरसेवक नाना काटे व शितल काटे व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते.

या उपक्रमाला पिंपरी,रहाटणी, पिंपळे सौदागर गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात घरगुती व सार्वजनिक असे एकूण 13 हजार 700 मूर्ती दान करण्यात आल्या.

Pimpri : शहीद भगतसिंग यांचे कार्य भावी पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देत राहील

मागीलवर्षी या उपक्रमात 10 हजाराहून जास्त गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. हे मूर्ती संकलन करण्याचे काम श्री फाउडेशन यांचा वतीने करण्यात आले.

या उपक्रमात माजी नगरसेवक (Pimple Saudagr) नाना काटे व शितल काटे हे स्वतः विसर्जन घाटावर उपस्थित राहून आवाहन करत होते. त्याबरोबर नाना काटे सोशल फाउंडेशन, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी, विविध संस्थाच्या स्वयंसेवकांनी भाविकांना मूर्तीदान व निर्माल्य कलशात टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.