Pimple Saudagar News: पाणी समस्या लवकरच सुटणार, 20 लाख लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण – नाना काटे

एमपीसी न्यूज – कुणाल आयकॅान रोड वरील रोझलॅन्ड सोसायटी (Pimple Saudagar News)शेजारील 20 लाख लिटर पाण्याची टाकी वॅाश आऊट करण्यात येणार आहे. ही  प्रक्रीया पुर्ण झाल्यावर लगेचच या टाकीवरून संपूर्ण कुणाल आयकॅान रोडवरील सर्व सोसायटीनां पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर मधील पाणी समस्या लवकरच सुटेल असा विश्वास माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केला.

 रहाटणी, पिंपळे सौदागरमधील पाणी समस्येबाबत  नाना काटे यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सुर्यवंशी, उपअभियंता दिपक पाटील यांच्या समवेत संयुक्त बैठक घेतली. काही दिवसांपासून रहाटणी, पिंपळेसौदागर मध्ये कमी व अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. नागरिकांना यामुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

तसेच रोझलॅन्ड शेजारील पाण्याची टाकी बांधुन पूर्ण झालेली आहे. तसेच या टाकी वरून पाणी पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुस 300 एमएम व्यासाची पाईप लाईन (Pimple Saudagar News)टाकलेली आहे. परंतु, टाकी परिसरात काही किरकोळ काम बाकी असल्याने ती चालु करण्यात आली नाही.

परंतु, ते काम आता पूर्ण झाले असुन या टाकीवरून पाणी पुरवठा केल्यास परिसरातील पाण्याची समस्या मिटेल ही बाब आयुक्त यांच्या निर्दशनास आणुन लवकरात लवकर ही पाण्याची टाकी चालु करावी अशी मागणी नाना काटे यांनी पत्राद्वारे केली होती.

Akurdi : शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आधुनिक तंत्रज्ञान वापरा –  प्रवीण तरडे

त्यानुसार आज मध्यरात्री कुणाल आयकॅान रोड वरील रोझलॅन्ड सोसायटी शेजारील 20 लाख लिटर पाण्याची टाकी वॅाश आऊट करण्यात येणार आहे.

ही प्रक्रीया पूर्ण झाल्यावर लगेचच या टाकीवरून संपुर्ण कुणाल आयकॅान रोडवरील सर्व सोसायटीनां पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे रहाटणी, पिंपळे सौदागर मधील पाणी प्रश्न मार्गी लागला असल्याचे काटे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.