Pimple Soudagar : रोझलॅन्ड रेसीडेन्सीच्या रहिवाशांनी जागतिक पक्षी दिनानिमित्त दिला चिऊ-काऊचा घास

जागतिक पक्षी दिना निमित्त रोझलॅन्ड रेसीडेन्सी, पक्षीमित्र चंदन चौरसीया व जिग्ना शहा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज लिनियर गार्डन येथे पक्षांसाठी खाद्य, भांडी, पाण्यासाठी भांडी तसेच उन्हापासुन घरटी बसवण्यात आली.

या उपक्रमाचे उदघाटन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे पल्स या वृत्तपत्राचे संपादक जैन सर, प्रतिनिधी कल्याणी निकुभं, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष झोपे काका, काळुराम कवितके, आरोग्य विभागाचे सोदाई व परिसरातील नागरिक विविध सोसायटी मधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.