BNR-HDR-TOP-Mobile

PimpleGurav : विज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरण अधिका-यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या दुर्देवी घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके आणि दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने काही महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करुन सावध आणि सुरक्षित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विद्युतविषयक कामे संबंधीची आढावा बैठक आज पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पार पडली.

  • या बैठकीत महावितरण चे अधिक्षक अभियंता पंकज कागल पुल्लीवार, पिंपरी महावितरणचे कार्यकारी अभियंता शिवायीज वायफळकर, चिंचवड विधानसभा मतदारसंघ वितरण विद्युत समिती अध्यक्ष संजय मरकड , तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नगरसेविका उषा मुंढे, माई ढोरे, आरती चोंधे, मोना कुलकर्णी, भारती विनोदे, नगरसेवक सागर आंघोळकर, राजेंद्र गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, व गोरख अंबरुळे, मधुकर बच्चे, काळूराम बारणे, रामदास कस्पटे, दिपक जाधव, राजेश शर्मा आदी उपस्थित होते.

विद्युत खांबाना दुचाकी टेकवून ठेवू नये, पायाखालची जमीन ओलसर असू नये, वायरची जोडणी करताना एकच वायर तुकड्या-तुकड्यात जोडू नये, जोडणी करताना त्यावर इन्शुलेशन टेप लावाली. विद्युत उपकरणांची दुरुस्ती करताना मेन स्विच बंद करावा, आदी सूचना यावेळी महावितरण अधिका-यांनी केल्या.

  • तसेच पावसाळ्यातील विद्युत दुरुस्तीची कामे, विद्युत सप्लाय अधिक वेळ बंद होणे, रस्त्यावरील व चौकातील वाहतुकीस, रहदारीस व पादचा-यांस अडचणीचे ठरणारे ट्रान्सफॉर्मन व फिडर पीलर यांची बसवण्याची योग्य जागा व सध्याची स्थिती, नागरिकांची विद्युतबाबत सर्व समस्यांचे निवारण करण्यात यावे.

या बैठकीत उपस्थितांकडून शंका निरसन करण्यात आले. त्यावर या बैठकीत झालेल्या मुद्द्यांवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी ठोस कारवाई करण्याचे आदेश या बैठकीत दिले.

HB_POST_END_FTR-A2