PimpleGurav : मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार होते. यावेळी खजिनदार दत्तात्रय धोंडगे, सचिव सूर्यकांत कुरुलकर, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे, जय भगवान संघाचे अध्यक्ष सुभाष धराडे, ह्युमन राईटसचे सदस्य सुनील काकडे, प्रबोधनकार शारदा मुंडे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य रामचंद्र कदम, वामन भरगंडे, अभिमन्यु गाडेकर, रमेश जाधव, वसंत जगदाळे, नामदेव पवार, अण्णा जोगदंड, प्रकाश इंगोले, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य महादेव पाटेकर, बिरू व्हनमाने, महादेव बनसोडे, भरत शिंगोटे, युवराज नलावडे, विजय वडमारे, मिनाक्षी खैरनार, सुनंदा भोज, मारुती बानेवर, शंकर तांबे, बळीराम माळी, संदिप पाटील आदी उपस्थित होते.

  • यावेळी अरुण पवार म्हणाले, गोपीनाथ मुंडे हे संघर्षशील नेते होते. त्यांनी शेतकरी, कामगार, सर्वसामान्य लोकांसाठी संघर्ष केला. म्हणूनच त्यांनी सर्वसामान्यांच्या देव्हार्‍यात स्थान मिळवले. तोच वसा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्याने कार्यरत राहिले पाहिजे. स्वाभिमान व संघर्ष हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. मुंडे हे सर्वसामान्य जनतेचे आधारस्तंभ होते. म्हणूनच त्यांना लोकनेते म्हणून ओळख मिळाली होती, अशा शब्दांत अरुण पवार आदरांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर सूर्यकांत कुरुलकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.