PimpleGurav : महाकवी कालिदासाचे साहित्य चिरकाल टिकणारे – निशिकांत गुमास्ते

एमपीसी न्यूज – महाकवी कालिदासांचे साहित्य भारतीय साहित्य विश्वाचा अमोल ठेवा आहे. संस्कृत भाषेतील सुभाषितांतून उपमा, अलंकार,ऋतुवर्णन, भाषासौदर्य याचा सुंदर मिलाफ कालिदासानी आपल्या ग्रंथातून केला आहे.प्रेम, विरह, तरलता याचे हुबेहूब चित्र “मेघदूत” मधून महाकवी कालिदास यांनी केले म्हणूनच महाकवी कालिदासांचे साहित्य आजच्या युगातही अजरामर आहे, असे विचार जेष्ठ कवी निशिकांत गुमास्ते यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण केंद्र पिंपळे गुरव आणि शब्दधन काव्यमंच यांच्या वतीने आषाढस्य प्रथम दिवशी महाकवी कालिदास दिनानिमित्य ‘काव्य, साहित्य विचार मंथन’ कार्यक्रम पिंपळे गुरव येथील कामगार कल्याण केंद्रात घेण्यात आला. गायक संगीतकार अक्षय लोणकर यांनी ” ओम नमो भगवते वासुदेवाय” भगवान विष्णू स्तुतीचे संस्कृत पद सादर केले.

  • आषाढ प्रथम दिनाचे औचित्य साधून कवी अनिल दीक्षित यांनी ” आषाढ हा आभाळाला लागलेला पाड” ही सुंदर गेय रचना सादर केली. प्रदीप गायकवाड यांनी ” शाळेत जाताना मला दिसतात फुलपाखरे” ही कविता सादर केली. संगीता झिंजूरके यांनी मायमराठीच्या गौरवाचे ” शृंगार मराठीचा नववधू परी” आणि कवयित्री मधूश्री ओव्हाळ यांची” एकदा कविता करून तर बघ, कवितेची मजा घेऊन तर बघ” ही कविता सादर करून रंगत आणली.

डॉ. दिलीप गरुड साहित्य संवाद साधताना म्हणाले, कवी मनाचा मालक आहे म्हणून तो जीवनाचा वेध घेऊ शकतो. निस्वार्थ भावातून उत्तम काव्यनिर्मिती होते. प्रास्ताविक केन्द्रप्रमुख प्रदीप बोरसे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश कंक यांनी केले तर, आभार जयश्री गुमास्ते यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.