PimpleGurav : तिने नव्हे ‘त्याने’ केली वटपोर्णिमा साजरी

पिंपळे गुरव येथील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – पारंपरिक रूढी व चालीरीतींना फाटा देत मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेच्या वतीने पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली. पिंपळे गुरव येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वडाच्या झाडाचे पूजन करून आणि त्याला सुती धागा बांधून सात फेऱ्या मारत पुरुषांनी स्त्री समानतेचा संदेश दिला.

आधुनिक युगात स्त्री आणि पुरुष प्रत्येक क्षेत्रात सोबतीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी सोबत असल्याने महिलांनीच का प्रत्येक जन्मी तोच नवरा मिळावा म्हणून पूजन करावे तर, पुरुषांनीही यासाठी वडाच्या झाडाचे पूजन केले तर ती खरी समानता होईल. नेमकी ही भावना समोर ठेवून मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संघटनेतर्फे पुरुषांनी वटपौर्णिमा साजरी केली.

  • स्त्री समानता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे. या भावनेने पुरुषही स्रियांसोबत आहेत. हा आगळ्या-वेगळ्या पूजनामागील उद्देश असल्याचे संघटनेचे अण्णा जोगदंड यांनी या वेळी सांगितले. पिंपळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने गेल्या चार वर्षांपासून वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. महाराष्ट्रात पूरूषांनी वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. जेष्ट महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. अश्वपती राजाची मूलगी सावित्री हिने सत्यवानशी विवाह करून जंगलात रहावयास गेली. एके दिवशी यमाने सत्यवानाला घेऊन जात असताना यमाबरोबरच गेली. शेवटी यमाने सत्यवान सोडून काहीही माग असे सांगितले.

  • तेव्हा तिने मला मुल द्या म्हणून सांगितले तेव्हा यमाने,” तथास्तु” असे म्हटले. फसलेल्या यमाने सत्यवानाला वटवृक्षाच्या झाडाखाली सोडून दिले. या दिवशी सात प्रदक्षिणा घालून दीर्घ आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाला सूत गूंडाळूण मनोभावे पूजा करतात. सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले. या कथेचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा करून,”सौभाग्य मागण्याचा हा दिवस”म्हणून साजरा केला जातो .

याबाबतीत बोलताना अण्णा जोगदंड म्हणाले, वटपोर्णिमा महिलांनीच का साजरी करावी? मग, पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे ठरू नये. म्हणून आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून सुत घालून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले. यानंतर अरुण पवार यांच्या हस्ते वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

  • यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर,शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, सचिव ,गजानन ,धाराशिव कर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा ,संगिता जोगदंड,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष, अरूण पवार, प्रविण गायकवाड, युवक सचिव , अक्षय जगदाळे, हेमंत नेमाडे आळंदी शहर सचिव रवि भेंनकी, आप्पाजी चव्हाण ,प्रकाश बंडे्वार ,हनुमंत पंडित,वसंतराव चकटे , पंडित वनसकर, वामन भरगंडे, सुर्यकांत कुरुंदकर, राजेंद्र गोराने, मुरलीधर दळवी, ईश्वर सोनोने, सचिन सागवे, बदाम कांबळे, विनायक बिराजदार, प्रदिप बोरसे,रविंद्र सुरवे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.