Pimplegurav : पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण;चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या किरकोळ वादातून चौघांनी मिळून दोन तरुणांना सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. ही घटना शानिवारी (दि. 12) रात्री दहाच्या सुमारास पिंपळेगुरव येथे घडली.

दीपक देवेंद्र गवळी (वय 18, रा. गजानन नगर, पिंपळे गुरव) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अश्विन चव्हाण, विपुल चव्हाण यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक आणि त्याचा मित्र गौरव लोहार हे गप्पा मारत असताना तिथे आलेल्या आरोपीने ‘तू माजला आहे का?’ असे बोलून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी गौरव याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.