Pimple Gurav : मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीतर्फे सुकलेल्या झाडांना जीवदान

एमपीसी न्यूज – मानवी हक्क संरक्षण आणि जागृती समितीने पिंपळे गुरव, नवी सांगवी, तसेच औंध जिल्हा रग्णालय परिसरातील दोनशेहून अधिक सुकलेल्या झाडांना पाणी घालून जीवदान दिले.

पाण्याअभावी पशुपक्षी मरण पावत आहेत, झाडे जळत आहेत. समाजाचे आपणाला काहीतरी देणे आहे या मानवतावादी दृष्टीकोनांतून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पाण्याचा टॅंकर उपलब्ध करुन दिला. यावेळी कार्यकर्त्यांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देऊन प्रत्येकाने एक तरी झाड लावून जगवण्याचे आवाहन शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केले.

विकास शहाणे, मुरलीधर दळवी, संगीता जोगदंड, मीना करंजवणे, आतिश गायकवाड, अक्षय जगदाळे, पंडीत वनसकर, राहुल शेंडगे, आप्पा चव्हाण, अशोक जाधव, श्रीरंग शितोळे, प्रदीप गायकवाड, विनायक बिराजदार, सचिन सांगवे, निलेश जगदाळे, विक्रम जगदाळे, बाळासाहेब शिंदे, सागर शेलार, सचिन नेमाडे आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.