Pimplenilakh : नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडूनमहापालिकेच्या शाळेत पालकसभा

एमपीसी न्यूज – नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेच्या शाळेत पालक सभेचे आयोजन केले. या पालकसभेत तुषार कामठे यांनी पालकांना शाळेत उपलब्ध सोयीसुविधांची माहिती पालकांना दिली.

कामठे म्हणाले, “सुसज्ज मैदान, भौतिक सुविधा, जिल्हा दर्जाची प्रयोगशाळा, रूम टू रीड वाचनालय, बजाज ई-लर्निंग संच ,अक्षरभारती तर्फे संगणक प्रशिक्षण,इसीए तर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प , फ़िट्राम कंपनीच्या माध्यमातून प्रोजेकटर व प्रत्येक वर्गात साउंड मेसेज सिस्टिम, अशा विविध सोयीसुविधा मिळवून आज आपल्या शाळेने खासगी शाळेच्या बरोबरीने भौतिक सुविधांबरोबर अध्यापन दर्जा उंचावला असून यावर्षी ७०० विद्यार्थी संख्येचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.