PimpleNilakh : महापालिका शाळेत दफ्तरविना शाळा उपक्रमांतर्गत गीतमंच कार्यक्रम  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळा पिंपळे निलख मुले मुली क्रमांक ५२ या शाळेत शनिवार दि. २० जुलैला दफ्तरविना शाळा हा उपक्रमांतर्गत गीतमंच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नगरसेवक तुषार कामठे म्हणाले, गाण्याच्या माध्यमातून चांगले परिपाठ झाल्यास शाळेची सुरुवात रोज चांगल्या प्रकारे होतील आणि संगीताच्या माध्यमातून मुलांच्या बौद्धिक क्षमतेत भर पडून नैतिक अधिष्ठान निर्माण होऊन सुसंस्कृत भावी पिढी घडेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.