PimpleSaudagar : प्रदुषणमुक्तसाठी पिंपळे सौदागर येथे लवकरच ई-स्कूटर सुविधा

एकदा चार्ज केल्यावर जाते ६० किलोमीटरपर्यंत; टॉप स्पीड २५ किलोमिटर प्रति तास, पहिले १५ मिनीटांची राईड फ्री

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘पे अँड ड्राईव्ह स्कूटर’ सुविधा आठ ते दहा दिवसामध्ये सुरु होणार आहे. आज नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे लिप कंपनीच्या स्कूटरची नागरिकांनी राईड घेतली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणारे स्कूटरचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रदूषणमुक्त पिंपळे सौदागर पेडल सायकलप्रमाणे आता नागरिकांसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पे अँड ड्राईव्ह तत्वावर ई- स्कूटर सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लिप कंपनी यांच्या सहयोगाने – कि लेस इलेक्ट्रोनिक स्कूटर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्कूटरचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्कूटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एकदा चार्ज केल्यावर ६० किलोमीटरपर्यंत जावू शकते. या इलेक्ट्रॉनिक स्कूटर (ई-स्कूटर) अॅण्ड्रॉईड अॅपद्वारे चालु किंवा बंद करता येते. तसेच ई-स्कूटरला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात. टॉप स्पीड २५ किलोमिटर प्रति तास आहे. प्रथमच पिंपळे सौदागर नागरिकसाठी ई-स्कूटर ही सेवा सुरू करण्यात येत आहे. नागरिकांना हि स्कूटर चालवण्यासाठी पहिले १५ मिनीटांची राईड फ्री असणार आहे. त्यानंतर प्रत्येक मिनिटासाठी १.५० रुपये आकारला जाणार आहे. कोणत्याही युपीआय अँप्सद्वारे पैसे पेड करून ई-स्कूटरचा वापर नागरिकांना करता येणार आहे.

या स्कूटरचे चार्गिंग पॉइंट गणेशम सोसायटीमधील बी.आर.टी.च्या पार्किंगमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरुवातीला कुणाल आयकॉन रोड वरील विविध ठिकाणी वीस स्कूटर ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून येथील नागरिकांना छोट्या कामासाठी चारचाकी घेऊन जाण्यापेक्षा ई-स्कूटरचा वापर करता येईल. यामुळे रस्त्यावरील होणारी वाहतूककोंडी काही प्रमाणात टाळता येईल. तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती नाना काटे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.