BNR-HDR-TOP-Mobile

PimpleSaudagar : पेडल सायकलप्रमाणे ई-स्कूटर सेवा होणार कार्यरत

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पुन्हा एक पाऊल स्मार्ट सिटीकडे वळवत ग्रीन सौदागर क्लिन सौदागर हा ध्यास मनात घेऊन प्रथमच पिंपळे सौदागर येथे ई-स्कूटर सेवा कार्यरत होणार आहे. येत्या पंधरा दिवसात प्रथम टप्यात प्राथमिक चाचणी घेऊन या ई-स्कूटरचे नियोजन केले आहे.

ही इ-स्कूटर अॅण्ड्राईड अॅपद्वारे चालू किंवा बंद करता येते ही स्कूटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एका तासात ६० कि.मि.चालवता येते ह्या इ-स्कूटर ला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात इ-स्कुटरची टॉप स्पीड ही २५ किमी प्रति तास आहे. वाढती महागाई आणि वाढते प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी हि संकल्पना प्रथमच पिंपळे सौदागर वाशीयांसाठी इ-स्कूटर ही सेवा सुरू करण्याचे ठरविले आहे.

ई-स्कूटर चालवण्यासाठी पाहिले १५ मि. राईड फ्री असणार आहे त्यानंतर इ-स्कुटर चालवण्यासाठी १.५० रु पर मिनिट आहे पैसे पेड करण्यासाठी युपीआय अप्स द्वारे पैसे पेड करून इ-स्कुटरचा आनंद नागरिकांना घेता येईल.

नगरसेवक शत्रुघ्न काटे पिंपळे सौदागर मधिल नागरिकांच्या स्वास्थ व आरोग्याची काळजी घेत पिंपळे सौदागर मध्ये अनेक ठिकाणी असलेले सायकल पॉईंट आहेत त्याच ठिकाणी या ई-स्कूटर पॉईंट आणि ई-स्कूटर चार्जिंग पॉईंट असल्याचे नियोजन केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.