PimpleSaudagar : उन्नतीचं एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फौंडेशनच्या वतीने एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रोज सकाळी आपल्या घरासमोर किलबिलाट करून झोप उडवणा-या व मनमोहक आनंद देणा-या पक्ष्यासाठी या वाढत्या शहरीकरणामध्ये पाणी पिण्याची सोय, खायला दाणे , व घरटे इत्यादी साहित्य पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर मैदान येथील झाडांवर ठेवण्यात आले.

यावेळी विकास काटे, राजेंद्र जयस्वाल, रामप्रकाश वासन , प्रकाश माशाळकर ,उषा वाकचवरे ,शोभा देवरे, मीनाक्षी देवतारे, विनोद भल्ला ,वनिता विजय रोकडे, जयश्री भोसले, सविता देशमुख , आनंद हास्य योग क्लबचे सभासद उपस्थित होते.

  • यावेळी उन्नती सोशल फौंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी “आठवूनी चिऊ-काऊचा घास, घेऊ पक्षी संवर्धनाचा ध्यास”. व पक्षी हे सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक आहे , पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आजची पिढी विसरत चालली आहे तर त्यासाठी असे उपक्रम होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.