BNR-HDR-TOP-Mobile

PimpleSaudagar: राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालाट -पार्थ पवार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड शहराचा राष्ट्रवादी काँग्रेसने कायापालाट केला. विकासकामे करुनही खोटे-नाटे आरोप केले. त्याचा फटका महापालिका निवडणुकीत बसला. मात्र, लोकांना आता कळाले आहे. राष्ट्रवादीचे नाव नाहक खराब करण्याचा प्रयत्न झाला. खरे काम तर राष्ट्रवादीनेच केले आहे. हे त्यांच्या लक्षात आले, असे मत मावळचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आज (रविवारी) शिवार गार्डन येथे पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील विविध सोसायटीमधील नागरिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अयोजक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, शितल नाना काटे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, शंकर काटे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेश भोंडवे, विविध सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • यावेळी पार्थ पवार बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुढील विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘व्हिजन’ विषयी माहिती देण्यात आली. पार्थ पवार यांनी मावळच्या विकासाठी असलेले ‘व्हिजन’ नागरिकांना सांगितले.

पार्थ पवार म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार यांनी मोठ-मोठे उद्योग आणले. शहरात उद्योग धंदे वाढले. त्यामुळे मार्केट वाढले. अर्थकारण वाढले. त्यामुळे राज्याच्या कानाकोप-यातून लोक शहरात येत आहेत. याला पवार यांनी मदत केली. शेतीच्या जागी आयटी हब झाले. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाले.

  • आपली काय परिस्थिती होती. आपल्याकडे काय होते. आपल्या आजुबाजूला काय होते आणि आता आपण कुठे आहोत? सोशल मीडिया, स्पर्धा यामध्ये पाच वर्षापुर्वी काय होतो. हे आपण विसरुन जात आहोत. आपल्या साथ कुणी दिली होती हे कळत नाही. कोणामुळे आपली प्रगती झाली. आपल्या आजुबाजूला कशी प्रगती झाली. हा विकास कोणामुळे झाला आहे. हे आपण विसरुन जातो, असेही पार्थ पवार म्हणाले.
HB_POST_END_FTR-A2

.