Pimple Saudagar : ओल्या कच-यावर प्रक्रिया करून खत निर्मिती

रोझव्हॅली सोसायटीचा उपक्रम

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओल्या कच-यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.साधारण  साडेआठशे लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला  कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशीनद्वारे खत निर्मिती करण्यात येते.या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक विठ्ठल ( नाना) काटे व नगरसेविका शितल विठ्ठल नाना काटे यांच्या हस्ते उदघाटन  करण्यात आले.
याबाबत माहिती देताना कृष्णा पराशर म्हणाले,  रोझ व्हॅली सोसायटीत एकूण 276 सदनिका आहेत.या सोसायटीत दररोज एकुण 1 टन ओला  कचरा संकलित केला जातो.ओला व सुका कच-याचे अलगीकरण करून तो सोसायटीतील प्लँट मधे संकलित करण्यात येतो.सध्या सोसायटीच्या  एकाच विभागात हे  काम सुरू करण्यात आले आहे एकुण एक टन ओल्या व सुक्या कच-यापासुन येथे खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प येथे सुरू करण्यात आला आहे.सोसायटीतील सर्व नागरीक या उपक्रमात योगदान देत आहेत. यात संकलित  झालेला कचरा प्लँट पर्यंत पोचविण्यासाठी जागोजागी कचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. जागेवरच ओला व सुका कच-याचे अलगीकरण होत असल्याने हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा मानस सोसायटी सभासदांकडुन करण्यात आला आहे.यासाठी सोसायटीच्या प्रत्येक कोपरा,आणी आवारात ओला व सुका कचरा संकलनासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत.सोसायटी परिसर व  उद्यानातील पडणारा पालापाचोळा,घरातील कचरा एका ठिकाणी संकलित केला जातो.. तीन महिन्यात संकलित कच-याची पहिली खेप (बँच) निघणार आहे.सुरूवातीला या खताचा सोसायटीतील घरातील फुलझाडे,उद्यानातील झाडांना या खताचा उपयोग करण्यात येणार आहे. तर गरजेपेक्षा आधिक संकलित झालेल्या खताची मागणीनुसार विक्री करणार असल्याचे सोसायटीच्या वतीने सांगण्यात आले.

नगरसेवक नाना काटे म्हणाले की, कच-यापासुन खत निर्मिती हा उपक्रम सर्वच मोठ्या सोसाट्यांनी राबविल्यास कचरा बाहेर येणार नाही.ख-या अर्थाने पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असल्याचे अशा प्रकल्पाकडे पाहुन वाटते.माझ्या प्रभागातील सोसायट्यांसाठी लागणारी मदत व सहकार्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यावेळी सोसायटीचे चेअरमन कृष्णा पराशर, सेक्रेटरी रुपेश भंडारे ,जयदेव दवे,विवेक महाजन,आनंद कुर्तडीकर , वेंकट शंकर,श्वेताभ कुमार,निधी ,व सोसायटीमधील सभासद तसेच कुणाल आयकॉन सोसायटीचे अध्यक्ष विनोद सुर्वे,प्राईम प्लस सोसायटीचे चेअरमन पंकज भाकरे  आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.