PimpleSaudagar : नाना काटे यांच्या संकल्पनेतून साकारतेय शिवसृष्टी

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील स.नं.३ आणि ८ पैकी आरक्षण क्र. 362 अण्णासाहेब मगर विद्यालयाच्या पाठीमागे व वरून पार्क शेजारी नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या संकल्पनेतून मैदानाच्या सुरक्षा भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग दर्शवणारे शिवसृष्टी शिल्प (म्युरल्स) ऐतिहासिक वास्तू शिल्पाचे भूमिपुजन तसेच अत्याधुनिक सोयीसुविधाने परिपूर्ण असणाऱ्या खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन आज गुरुवार दिनांक ७ मार्च रोजी सकाळी दहा वाजता हभप. समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक शंकर काटे, ज्ञानेश्वर हांडे, ज्ञानेशवर काटे, विलास काटे, विजय काटे, संपत मेटे, शिवाजी काटे, पोपट जगताप, अर्जुन काटे, सोपान काटे, शेखर काटे, राजू काटे, प्रकाश काटे, गणेश काटे, एकनाथ ववले, डीगंबर जगताप, प्रमोद काटे, जयवंत बोडके, नितीन काटे,संजय काटे, तानाजी काटे, सुरेश काटे, गोविंद काटे, गोविंद वलेकर, युवराज काटे, सुनील काटे, हरेश नखाते,महापालिकेचे स्थापत्य विभागाचे उपभियंता सुनील पाटील, कनिष्ठ अभियंता नरेश जाधव,हभप.विलास बाबुराव काटे, अर्जुन काटे,चंद्रकांत काटे, ग्रामस्थ व सोसायटीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ऐतिहासिक वास्तू शिल्पाची संकल्पना साकारण्यासाठी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार आज या कामाचे भूमिपूजन झाले असून एक एकर जागेत हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे काटे यांनी सांगितले.

तसेच शिवाजी महाराजांचा इतिहास नागरिकांच्या डोळ्यासमोर उभा करण्यासाठी अशा शिल्पाची आवश्यकता असल्याचेही नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.