Pimple Saudagar : पी. के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचा सांगता समारंभ

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील व्ही.एच.बी.पी पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रिडा सप्ताह समारंभाची सांगता करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

रेड हाऊस व ग्रीन होऊस यामध्ये कबड्डीचा अंतिम सामना झाला. त्यामध्ये रेड हाऊस ने विजय मिळविला . तसेच मुलींच्या रेड व ग्रीन हाऊस संघामध्ये बॅडमिंटन खेळाचा अंतिम सामना रंगला. यामध्ये ग्रीन हाऊस विजेता ठरला. या समारंभाचे आकर्षण म्हणजे पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये सर्वच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समारंभाच्या वेळी विजेत्या स्पर्धकांना मेडल्स व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. पूजा शेलार (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू ), सुनील सिध्दगवळी यांनी मुलांना मैदानी खेळाचे महत्व सांगून त्यांनीही या क्षेत्रात नाव मिळवावे याविषयी मार्गदर्शन केले.शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे मुलांना अभ्यासाबरोबरच खेळाला महत्त्व द्यावे असे सांगितले.

यावेळी दिपाली काजळे, उमेश तांबे, मुख्याध्यपिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे आणि सविता आंबेकर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी ,पालक उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा राठोड व शिल्पा गायकवाड यांनी केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.