BNR-HDR-TOP-Mobile

PimpleSaudagar : गोविंद चौकातील सब-वे चा एक मार्ग १५ फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला

नगरसेविका निर्मला कुटे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात सुरू असलेल्या सब-वे कामाची भाजपच्या स्थानिक नगरसेविका निर्मला कुटे यांनी शुक्रवारी (दि. ८) पाहणी केली. स्वराज चौक ते कोकणे चौक, पी. के. चौकाकडे जाणारा मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात सब-वे चे काम सुरू आहे. नगरसेविका निर्मला कुटे यांनी गोविंद चाकौत जाऊन कामाची पाहणी केली. तसेच कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, काशिद, दहाडे, कन्सल्टंट पतंगे आदी उपस्थित होते.

  • नगरसेविका कुटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनुसार सब-वेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले. आमदार जगताप यांनी पिंपळे सौदागर आणि रहाटणीतील रस्ते सिग्नल फ्री करण्याच्या उद्देशाने विकासकामांचे नियोजन केले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यानुसार कामांना प्रगती देण्यास त्यांनी सांगितले. तसेच गोविंद चौकातील सब-वे स्वराज चौक ते कोकणे चौक, पी. के. चौककडे जाणारा मार्ग १५ फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
HB_POST_END_FTR-A4

.