Pimplesaudagar : पिंपळे सौदागरवासियांनी अनुभवले ‘७५ तास खगोलशास्त्रीय निरिक्षण

एमपीसी न्यूज – ज्योतिविद्या परिसंस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त “७५ तास खगोलशास्त्रीय निरिक्षण” हा कार्यक्रम पिंपळे सौदागर येथे संपन्न झाला.

गोविंद यशदा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज लिनीअर अर्बन गार्डन येथे शुक्रवार दि.८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी आपल्या मुलांसह हजेरी लावली होती. पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथशेठ काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • या कार्यक्रमात खगोलशास्त्राबद्दल खुली चर्चा आणि आकाशातील ग्रहांची पूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी अभय सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी टेलिस्कोपने सनसेटची पाहणी टाईम लॅप्स फोटोग्राफी, आकाशातील विविध हालचाली खगोलशास्त्रीय उपकरणातून दाखविण्यात आल्या. लहान मुलांनी कुतूहलपूर्वक सर्व गोष्टी जाणून घेतल्या.

यावेळी पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथशेठ काटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनचे लहान मुले, तरुण वर्ग, जेष्ठ नागरिक यांनी आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.