Pimple Saudagar : उन्नती फाऊंडेशनच्या वतीने भारतीय वायुसेनेच्या कामगिरीबद्दल पेढे वाटून जल्लोष

एमपीसी न्यूज – पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले आहे. वायुसेनेनं केलेल्या या कामगिरीबद्दल पिंपळे सौदागरमधील उन्नती फाऊंडेशनच्यावतीने पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.

उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने उन्नती कार्यालय येथे मंगळवारी (दि.26) संध्याकाळी 6 वाजता भारतमातेचे पूजन करून भारतीय वायुसेनेच्या कामगिरी बद्दल सर्वांना मिठाई वाटप करण्यात आले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. या वेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

“पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात उन्नती सोशल फाऊंडेशन व सर्व सहकारी सहभागी आहोत. हा हल्ला म्हणजे दहशदवाद्यांचा भ्याड हल्ला असून अशा प्रकारचे हल्ले भारतीय लष्कर कदापी सहन करणार नाही” असे मत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी व्यक्त केले.

यावेळी निर्मलचंद उधोजी, राजू देवतारे, विकास काटे, गुलाब मेटे, राजू शेलार, बच्छराज शर्मा, रमेश वाणी, सुभाष पवार, विवेक भिसे, विवेक तितरमारे, राजेंद्र जसवाल, राजू देवतारे, कविता भिसे, जयश्री भोसले, सुनीता बच्चे, आनंद हास्य योगा क्लबचे सर्व सभासद, ज्येष्ठ नागरिक संघ, नवचैतन्य हास्य क्लबचे सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.