Pimpr: पार्थ पवार सोशल फाउंडेशनतर्फे महापालिका, पोलीस विभागाला अडीच हजार लिटर सॅनिटाईझर

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आज (सोमवारी) पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका आणि पोलीस विभागातील विविध कार्यालयात सॅनिटाईझर वाटप करण्यात आले.

यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला अध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक मयुर कलाटे, उषा वाघेरे, सुलक्षणा धर, उषा काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काळभोर, विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, श्याम जगताप , तानाजी जवळकर, पुणे ग्रामीण विध्यार्थी अध्यक्ष करण कोकणे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील विविध भागात आणि महापालिका व पोलीस विभागात मास्कचे वाटप करण्यात आले होते. त्यांनंतर शहरातील सर्व भागात ज्या ठिकाणी नागरिकांना जेवणाची अडचण असेल अशा नागरिकांना जेवणाचे नियोजन आजपर्यंत चालू असून या पुढे पण चालूच राहणार आहे.

याचबरोबर आज महापालिकेचे सर्व आठ प्रभाग कार्यालय, महानगरपालिकेची मुख्य इमारत, महापालिका दवाखाने, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा युनिट, पोलीस चौक्या या ठिकाणांवर एकूण मिळून अडीच हजार लिटर सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे डॉ. राजेश वाबळे, पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर.आर. पाटील, उपायुक्त सुधीर जाधव, सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साबळे साहेब व अजय भोसले, खंडणी शाखा युनिटचे सुधीर अस्पत, चिंचवड पोलीस स्टेशनचे निरीक्षक खुळे साहेब, वाकड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हरीश माने, गुन्हे शाखा युनिट 4 चे मोहन शिंदे आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पार्थ पवार यांचे आभार मानले.

सर्वसामान्य नागरिकांसाठी आपला जीव धोक्यात घालून महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गेले कित्येक दिवस रात्रंदिवस राबत आहेत. आपल्या जीवाची पर्वा नकरता काम करत आहेत.

या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने पार्थ अजित पवार यांनी पुढाकार घेऊन काही दिवसापूर्वी मास्कचे वाटप केले होते. त्यांनंतर आज सॅनिटाईझर वाटप केले. याबद्दल विरोधी पक्षनेते काटे यांनी शहरातील नागरीक, महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने पार्थ पवार यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.