Pimpri : ‘लॉकडाऊन’ सुरक्षित आणि सुसह्य करण्याच्या ‘टिप्स’

मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

एमपीसी न्यूज- लाॅकडाऊनमध्ये कसे सुरक्षित रहायचे आणि आपले जीवनपद्धती कशी सोपी करायची याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. यामध्ये लाॅकडाऊन दरम्यान स्वत:ला कोरोना या विषाणूपासून कसे सुरक्षित ठेवू शकतो, याबद्दल सोपी पण महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

# ग्राहकांनी दुकानाबाहेर योग्य अंतर राखून रांगेत उभे राहावे.

# आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी केवळ एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे.

# घराबाहेर पडताना मास्क वापरावा.

# खरेदी करताना व पैसे देताना दुकानदारापासून योग्य अंतर राखावे.

# घराबाहेर असताना अनावश्यक वस्तूंना हात लावणे टाळावे.

# पोलिसांनी थांबविल्यास तुमचे घराबाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करा.

# गर्दी व संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी व्हाट्सअपवर ऑर्डर घेऊन ग्राहकांना डिलिव्हरीची वेळ द्यावी.

# अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर असलेल्यांनी आपले ओळखपत्र सतत जवळ ठेवावे.

# ड्रायव्हर, नोकर इ. यांना पगारी रजा द्या. कामावर येताना त्यांना संसर्ग झाला तर तो तुम्हालाही होऊ शकतो.

# डिलिव्हरीसाठी येणाऱ्या व्यक्तींपासून सुरक्षित अंतर राखा.

# घरी आल्यावर प्रथम आपले हात साबण व पाण्याने धुवा.

# खरेदीसाठी एक वेगळी पिशवी राखून ठेवा.

# संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक टाळा.

# संसर्गाची चिन्हे दिसल्यास प्रथम स्वतःला सर्वांपासून वेगळे करा आणि हेल्पलाइनवर फोन करा.

या काही सोप्या सवयींमुळे तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.