Pimpri : दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर सहप्रवासी महिला गंभीर जखमी झाली. ही घटना चिंचवड स्टेशन येथील ग्रेडसेपरेटरमध्ये सोमवारी (दि. 16) सायंकाळी घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि. 17) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष लखमीचंद भुंबक (वय 23, रा. ओटास्कीम, निगडी) असे मयत दुचाकीस्वार तरुणाचे नाव असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चांदणी रवी चंडालिया (वय 24, रा. मालाड, मुंबई) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिला दुचाकीवरून(एम एच 14 / एफ एफ 7443) मोरवाडीकडून निगडीकडे जात होते. भरधाव वेगातील दुचाकी चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात ग्रेडसेपरेटर रोडवर घसरली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भुंबक याचा मृत्यू झाला. तर फिर्यादी चांदणी या गंभीर जखमी झाल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.