एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1012 जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 266 जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 26 हजार 118 वर पोहोचली आहे.

आज 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विकासनगर, किवळेतील 77 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 63, 46 व 52 वर्षीय तीन पुरुष, चिंचवड येथील 62 व 65 वर्षीय महिला, 64, 36 वर्षाचा युवक, भोसरीतील 86 वर्षीय वृद्ध, कासारवाडीतील 70 वर्षीय पुरुष, थेरगावातील 65 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, मोशीतील 60 वर्षीय महिला, 74 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 64 वर्षीय महिला, दापोडीतील 70 वर्षीय महिला, निगडीतील 70 वर्षीय पुरुष, दिघीतील 70 वर्षीय महिला, नेहरुनगर येथील 75 वर्षीय पुरुष, रुपीनगर येथील 45 वर्षीय पुरुष, च-होलीतील 59 वर्षीय पुरुष आणि नारायणगाव येथील 85 वर्षीय पुरुष, शिरुर मधील 36 वर्षाचा युवक, येरवड्यातील 75 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 26 हजार 118 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 17, 673 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 444 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 101 अशा 545 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 4175 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1801

# पॉझिटीव्ह रुग्ण – 1012

#निगेटीव्ह रुग्ण – 757

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -1703

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 4175

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 1513

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -26,118

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 4175

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 545

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -17,673

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 18528

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 58765