Pimpri: सातपैकी एका क्षेत्रीय प्रभाग ‘कोरोनामुक्त’; दोन ‘हॉटस्पॉट’, आपल्या भागात कोरोनाचा संसर्ग किती?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सात क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये तळवडे, रुपीनगर परिसर येत असलेला ‘फ’ क्षेत्रीय प्रभाग आणि भोसरी, दिघी, च-होली, बोपखेल हा भाग येत असलेला ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग ‘हॉटस्पॉट’ झाले आहेत. ‘फ’ क्षेत्रीय प्रभागात सर्वाधिक 26 आणि ‘इ’ क्षेत्रीय प्रभागात 22 रुग्ण आहेत. तर,  रावेत, किवळे, मामुर्डी, चिंचवडचा परिसर येत असलेल्या ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग अद्यापपर्यंत कोरोनामुक्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या आठपैकी सात क्षेत्रीय प्रभागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. आज प्रसिद्ध केलेल्या नकाशात कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘फ’ क्षेत्रीय प्रभागातील रुग्णांचा चढता आलेख कायम असून सर्वाधिक 26 रुग्ण आहेत. तर, ‘इ’ क्षेत्रीय प्रभागात रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाला असून 22 वर आला आहे.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय रुग्ण संख्या!

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,   मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात (कोरोनाचे दोन पॉझिटीव्ह रुग्ण आहे)

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड, काळेवाडी भागात (कोरोनाचा एकही रुग्ण नाही).

‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात (कोरोनाचे पाच रुग्ण आहेत)

‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात (कोरोनाचे चार रुग्ण आहेत).

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात (कोरोनाचे  22 रुग्ण आहेत). हा प्रभाग हॉटस्पॉट ठरला आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या भागात ( कोरोनाचे सर्वाधिक 26 रुग्ण आहेत). हा प्रभाग हॉटस्पॉट ठरला आहे.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात (कोरोनाचे पाच रुग्ण आहेत.).

‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, कासारवाडी, दापोडी,फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात (कोरोनाचे पाच रुग्ण आहेत).

शहरातील कोरोनाच्या सक्रिय 69 रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, शहराबाहेरीलही काही रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजपर्यंत 107 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 31 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.