Pimpri: शहरात कोरोनाबाधित युवकांची शंभरी; युवकवर्गात चिंता अन् भीतीचे वातावरण  

Pimpri: 101 corona infected youths in the city; Anxiety and fear among the youth

एमपीसी न्यूज – कोरोनाचा जास्त धोका वयोवृद्ध आणि लहान मुलांना असला तरी कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांना आहे. कोरोनाने अशरक्ष: युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 101 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आजपर्यंत शहरातील 242 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर  कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. शहरातील 242 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 138 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 97 सक्रिय रुग्णांवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी 84 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. पण त्यांना काहीच लक्षणे नाहीत. तर, 11 रुग्णांमध्ये लक्षणे असून दोन रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, शहरातील सात जणांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण 22 ते 39 वयोगटातील युवकांमध्ये आहे. आजपर्यंत शहरातील तब्बल 101 युवकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने सर्वाधिक युवकांना विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 22 ते 39 वयोगटातील तब्बल 101 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वय वर्ष असलेल्या 36 तरुणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 27 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 26 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.