Pimpri : गुन्हे शाखेकडून 105 लिटर हातभट्टीची दारू जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनने 105 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. तसेच एकावर याबाबत गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास निराधारनगर झोपडपट्टी, भाटनगर समोर, पिंपरी येथे करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस नाईक जयवंत जगन्नाथ राऊत यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास बापु सपताळे (वय 32, रा. निराधारनगर झोपडपट्टी, भाटनगर समोर, पिंपरी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस पिंपरी परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, निराधारनगर झोपडपट्टी, भाटनगर समोर, पिंपरी येथे एक व्यक्ती गावठी दारू विकत आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून आरोपी कैलास याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून 105 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि रोख रक्कम असा एकूण 25 हजार 520 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीवर पिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हीबीशन अक्ट कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.