Pimpri: दिवसभरात कोरोनाचे 105 नवे रुग्ण ; 55 जणांना डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

105 new patients of corona during the day; 55 discharged, two killed

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 100 आणि महापालिका 5 हद्दीबाहेरील अशा 105 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पवारनगर जुनी सांगवीतील 64 वर्षीय पुरुष आणि गवळीनगर भोसरीतील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 2134 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील वैदुवस्ती पिंपळे गुरव, जैन मंदीर दिघीरोड, आदर्शनगर दिघी, नढेनगर, मोरेश्वर कॉलनी थेरगांव, अजंठानगर, चिखली, वडमुखाडी, बिजलीनगर, नखातेनगर थेरगांव, बोपखेल, रामनगर, वाकड, नवी सांगवी, धावडेवस्ती, चिंचवड, प्राधिकरण, पवारनगर सांगवी, ताम्हाणेवस्ती चिखली, मोरेवस्ती, इंदिरानगर चिंचवड, साईबाबानगर चिंचवड, चक्रपाणी वसाहत भोसरी, दिघीरोड भोसरी, बौध्दनगर ,मोरवाडी, केशवनगर चिंचवड, संत तुकाराम नगर, सांगवी गावठाण, नेहरुनगर, विजयनगर काळेवाडी, खंडोबामाळ भोसरी, कैलासनगर थेरगांव, डिमार्ट पिंपरी, पिंपरीगांव, मोशी, काळभोरनगर, सिध्दार्थनगर दापोडी, मोहननगर, भाटनगर, एम्पायर इस्टेट, यमुनानगर, इंदिरानगर, नाशिकफाटा, परिसरातील 100 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 58 पुरुष आणि 42 महिलांचा समावेश आहे. तर, कुर्डुवाडी, सदाशिवपेठ, तळेगांव चाकण रोड येथील 4 पुरुष आणि एक महिलेलाही कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, रमाबाईनगर पिंपरी, प्रियदर्शन नगर सांगवी, बेलठीकानगर थेरगांव, मोरवाडी, वैभवनगर, नानेकरचाळ पिंपरी, गुलाबनगर दापोडी, अंकुशचौक निगडी, तापकिर चौक मोशी, पिंपळे सौदागर, ताम्हाणे वस्ती, सद्गुरुकॉलनी वाकड, बौध्दनगर, मिलिंदनगर पिंपरी, उद्यमनगर पिंपरी, शिवशक्ती चौक भोसरी, हिंदचौक पिंपळे निलख, विठ्ठलनगर नेहरुनगर, बापदेवनगर किवळे, यमुनानगर, रुपीनगर, नेहरुनगर, संभाजीनगर चिंचवड, च-होली, चिखली, सुर्दशनगर चिंचवड, बालाजीनगर चाकण, पवनानगर पुणे, लोहगांव, वडगांव मावळ, कोंढवा, येरवडा, कान्हे, नवीपेठ पुणे येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 55 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 2134 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1252 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 37 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 25 अशा 62 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 835 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 394

# पॉझिटीव्ह रुग्ण – 105

#निगेटीव्ह रुग्ण – 100

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 352

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1283

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 214

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 2134

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 835

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 62

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1252

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23389

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 72834

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.