Pimpri: कोरोना हॉटस्पॉट ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 1091’अ‍ॅक्टीव्ह’ रुग्ण,आपल्या भागात किती रुग्ण?

1091 active patients in Corona Hotspot 'E' field office area, how many patients in your area?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात  कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे.  मागील काही दिवसांपासून रुग्ण वाढीचे उच्चांक होत आहेत.  महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 1091 सक्रिय रुग्ण आहेत. हा प्रभाग कोरोना हॉटस्पॉट झाला आहे.

तर, सर्वात कमी म्हणजेच 376 रुग्ण ‘ह’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत. महापालिकेने शुक्रवारी (दि.24) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. आज आतापर्यंत 65 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंतची रुग्ण संख्या 14 हजार 760 झाली आहे.

शहरात 10 मार्च पासून शहरातील 14 हजार 760 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  त्यापैकी 9103 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  शहरातील 5390 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 274  जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यात झोपडपट्टी, गावठाण भागातील सर्वाधिक रुग्ण वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील रुग्णसंख्या  15 हजारच्या उंबरठ्यावर असून  जुलैअखेरपर्यंत 24  हजार रुग्णसंख्या होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. शुक्रवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी परिसर येत असलेल्या  ‘इ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक 1091  तर त्याखालोखाल ‘अ’ कार्यालयाच्या हद्दीत 984 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!

  • ‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर,  मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 984 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीतील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे.
  • ‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत,  किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात 679 सक्रिय रुग्ण आहेत.
  • ‘क’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 606 रुग्ण आहेत.
  • ‘ड’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 425 सक्रिय रुग्ण आहेत.
  • ‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात कोरोनाचे सर्वाधिक 1091 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे.
  • ‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली,  कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर,  यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 570 रुग्ण आहेत.
  • ‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 681 सक्रिय रुग्ण आहेत.
  • ‘ह’ –  क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे सर्वात कमी म्हणजेच 376 सक्रिय रुग्ण आहेत.

तर, आज शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत 65 जणांना लागण झाली आहे. शहरात एकूण 5390 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.