Pimpri: शहरातील 1121 रुग्ण आज कोरोनामुक्त,  नवीन 969 रुग्णांची नोंद,  21 मृत्यू

1121 patients in the city today corona-free, new 969 patients registered, 21 deaths

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 1121 जणांनी आज (शुक्रवारी) कोरोनावर मात केली. तर, शहराच्या विविध भागातील 960 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 969 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 27 हजार 78 वर पोहोचली आहे.

आज 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  रहाटणीतील 65 वर्षीय  महिला, पिंपळेगुरव येथील 60 वर्षीय महिला, मोरवाडीतील 62 वर्षीय   पुरुष, पिंपरी, संत तुकारामनगर  येथील 52 वर्षीय पुरुष, थेरगावातील 65 वर्षीय  महिला, 49 वर्षीय  पुरुष, वाल्हेकरवाडीतील 65 वर्षीय  महिला, मोशीतील 60 वर्षीय महिला, 74 वर्षीय  वृद्ध, काळेवाडीतील 64 वर्षीय  महिला, दापोडीतील 70 वर्षीय  वृद्ध महिला, रुपीनगर निगडीतील 70 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष,  दिघीतील 70 वर्षीय पुरुष,  बिजलीनगर येथील 65 वर्षीय  महिला, नेहरुनगर येथील 75 वर्षीय  पुरुष शिरुर येथील 36 वर्षाचा युवक, नारायणगाव मधील 85 वर्षीय वृद्ध,  चाकण येथील 44 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला,  येरवड्यातील 74 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 27 हजार  78 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 18, 794 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 460 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 106 अशा 566 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 4827 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 2484

# पॉझिटीव्ह रुग्ण – 969

#निगेटीव्ह रुग्ण – 1010

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण -2217

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 4827

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 3378

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या -27, 078

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 4827

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 566

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या -18,794

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 19209

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 60790

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.