HB_TOPHP_A_

Pimpri: स्मार्ट सिटीअतंर्गत प्रायोगिक तत्वावर 12 शाळा होणार स्मार्ट

384

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवडमधील बारा शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. तसेच 15 जानेवारीपर्यंत शहराच्या उर्वरित भागात ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी सात हजार सायकली खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

HB_POST_INPOST_R_A

महापालिका स्तरावरील स्मार्ट सिटी संचालकांची बैठक आज (बुधवारी) झाली. यावेळी महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, सह शहर अभियंता राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण उपस्थित होते. बैठकीत प्राथमिक विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर अनुपस्थित असल्याने ही बैठक उद्या (गुरूवारी) घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ”स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. 40 कोटी निधी खर्च करुन त्याअंतर्गत अत्याधुनिक सेवासुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर 12 शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर टप्याटप्याने महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. याशिवाय शहराच्या उर्वरित भागात 15 जानेवारीपर्यंत ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सात हजार सायकली खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रूग्णालय आणि सेक्टर 22 मधील महापालिका इमारतींवर सोलर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या विषयाची माहिती दिल्याशिवाय करारनामा करण्यात येऊ नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.

…या शाळा होणार स्मार्ट

पिंपळेगुरव येथील 54 नंबरची शाळा, चिखली म्हेत्रे वस्तीतील शाळा, सांगवीतील पी.एच. होळकर मुलांची शाळा क्रमांक 49 आणि पिंपळेसौदागर येथील 51 नंबरची या चार प्राथमिक शाळा तसेच पिंपळे गुरव, पिंपळेसौदागर येथील दोन माध्यमिक शाळा, जाधववाडी येथील साई जीवन विद्यामंदिर, निगडीतील मधुकर पवळे स्कूल, लांडेवाडी भोसरी येथील सावित्रीबाई फुले शाळा, चिखलीतील महापालिका शाळा मुले आणि मुली, कुदळवाडी येथील महापालिका शाळा, जाधववाडी येथील मुले मुली शाळा, तळवडे येथील अंतुजी भालेकर शाळा, भाटनगर पिंपरी येथील नवनाथ दगडू साबळे शाळा, मोहननगर चिंचवड येथील खिवंसरा पाटील शाळा या शाळांची पहिल्या टप्यात निवड केली आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: