Pimpri: महापालिकेतील 120 अधिकारी, कर्मचा-यांचे बदलीसाठी अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांकडून मागविलेल्या बदलीच्या प्रस्तावाला थंडा प्रतिसाद मिळाला आहे. बदल्यांसाठी एकूण 120 अधिकारी, कर्मचा-यांचे अर्ज प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये गट ‘अ’ च्या एका अधिका-यांचा समावेश आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र ठरणारे तसेच वैयक्‍तिक व वैद्यकीय कारणास्त बदली हवी असलेल्या कर्मचा-यांची यादी पाठविण्याचे परिपत्रक प्रशासन विभागाने 22 जानेवारी रोजी काढले आहे.

  •  यामध्ये गट ‘अ’ ते ‘क’ मधील अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे. 31 जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचा-यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार गट ‘अ’ मधील एका अधिका-याने बदलीसाठी अर्ज सादर केला आहे. तर, गट ‘ब’ मधील तीन आणि ‘क’ मधील 102 कर्मचा-यांचा समावेश अहहे. त्याचबरोबर गट ‘ड’ मधील 16 कर्मचानी बदलीसाठी अर्ज केले आहेत. विभागप्रमुखांकडून प्राप्त झालेल्या या अर्जांची तपासणी करून बदलीस पात्र ठरणा-या कर्मचा-यांची बदली केली जाणार आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like