Pimpri: पवना धरणातून उद्या सकाळी 1200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पवना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे आज (शुक्रवारी) सायंकाळी धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे उद्या (शनिवारी) सकाळी सहा वाजता 1200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांनी, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पवना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वेगाने वाढ झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे यापुढे धरणात येणारा पाऊस (येवा) नुसार धरणातून विसर्ग सोडावा लागणार आहे. उद्या (शनिवारी) सकाळी सहा वाजता 1200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांनी, नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • जोरदार पाऊस पडत असल्याने पवना नदी दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढेल. त्यामुळे नदी किनारील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

याबाबत बोलताना पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गदवाल म्हणाले, ”पवना धरणात आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत 92 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आज रात्रभर पाऊस कसा पडतो? हे पाहिले जाणार असून उद्या (शनिवारी) सकाळी सहा वाजता 1200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी, नागरिकांनी सतर्क रहावे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहणे गरजेचे आहे”.

तसेच मुळशी धरणातून मुळा नदीपात्रात आवश्यकतेनुसार रात्री 10.00 वा.6600 क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार असून त्यानुसार संबंधीतांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे, टाटा पाॅवर व महसूल प्रशासन, मुळशी यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.