Pimpri : भारतीय जनता युवा मोर्चाच्या रक्तदान सप्ताहात 1224 जणांनी केले रक्तदान

1224 people donated blood during the week of Bharatiya Janata Yuva Morcha

एमपीसी न्यूज – भाजपा सरकारची वर्षपूर्ती आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आयोजित रक्तदान सप्ताहात जवळपास 1224 जणांनी रक्तदान केले.

कोरोनाच्या संकटकाळात राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील कुदळवाडी, पिंपळेनिलख, गव्हाणे वस्ती, वाकड, यमुनानगर, प्राधिकरण, संत तुकारामनगर, चिंचवडगाव, श्रीधरनगर, इंद्रायणीनगर, रहाटणी, रावेत, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपरी येथील परिसरात राबवण्यात आलेल्या रक्तदान सप्ताहास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शहरातून जवळपास 1224 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन करण्यात आले.

स्थानिक भाजपा नगरसेवक, बीजेएस आणि पीएसआय, बिर्ला हॉस्पिटल, पीसीसीबी या ब्लड बँकेच्या सहकार्याने भाजयुमोचे अजित कुलथे, दीपक नागरगोजे, दिनेश यादव, देवयानी भिंगारकर, अमित गुप्ता, तेजस्विनी कदम, सुमित घाटे, प्रदीप पटेल, मुक्ता गोसावी, विक्रांत गंगावणे, शिवराज लांडगे, संकेत कुटे, अभिजित साळुंखे, प्रकाश चौधरी यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.