Pimpri: चिंताजनक !, सक्रिय 1869 पैकी 1275 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत

Pimpri: 1275 out of 1869 active patients have no symptoms of corona शहरातील झोपडपट्यांमध्ये रुग्णांची सर्वाधिक वाढ होत आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी त्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. लक्षणे नसलेले रुग्ण कोरोना’वाहक’ होऊ शकतात अशी भीती व्यक्त करत वैद्यकीय तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आजमितीला 1869 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1275 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. तर, 172 रुग्णांमध्ये लक्षणे असून 34 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्याच्या मध्यापर्यंत रुग्णवाढ नियंत्रणात होती. परंतु, 22 मे रोजी शहराला रेड झोनमधून वगळले. तेव्हापासून शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

संपूर्ण शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. शहरातील झोपडपट्यांमध्ये रुग्णांची सर्वाधिक वाढ होत आहे.

मागील आठ दिवसांपासून दररोज रुग्णवाढीचा नवा उच्चांक होत आहे. 300 ते 580 पर्यंत दिवसाला रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. ही समाधानाची बाब मानली जात आहे. आजपर्यंत शहरातील 2855 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असली. तरी 80 टक्के पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. आजमितीला 1869 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1275 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पण लक्षणे काहीच नाहीत.

तर, 172 रुग्णांमध्ये लक्षणे असून 34 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. लक्षणे असलेल्या रुग्णामध्ये देखील वाढ होत आहे. सुरुवातीला बोटावर मोजण्याइतक्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे होती.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

कोरोनाने तरुणांना विळखा घातला आहे. 22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील तब्बल 1877 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे.

त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 1299 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 564 तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 498 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 543 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like