Pimpri : भारत बंद आंदोलनात 13 मनसे सैनिकांची अटक आणि सुटका

एमपीसी न्यूज – काँग्रेस आणि सर्व समविचारी पक्षांच्या वतीने वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीविरोधात सोमवारी (दि. 10) देशभर भारत बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पिंपरी मध्ये मनसेच्या 13 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तसेच सोमवारी सायंकाळी सर्वांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली.

अश्विनी राजेश बांगर (वय 43, रा. प्रेमसागर सोसायटी, चिंचवड), सीमा जितेंद्र बेलापूरकर (37, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), अनिता बालाजी पांचाळ (वय 35, रा. काळेवाडी), रुपाली चंद्रकांत गिलबिले (वय 40, रा. च-होली, वडमुखवाडी), स्नेहल प्रशांत बांग (वय 42, रा. भोईर कॉलनी, चिंचवड), अदिती विष्णू चावरीया (25), शोभा विष्णू चावरीया (वय 25, दोघी रा. काळभोर नगर, चिंचवड), सचिन तुकाराम चिखले (वय 34, रा. निगडी), दत्ता भाऊराव देवतरासे (वय 33, रा. रामनगर, चिंचवड), अक्षय बबन नाळे (वय 24, रा. चिंचवडे नगर, चिंचवड गाव), मयूर राजेंद्र चिंचवडे (वय 35, चिंचवड), विशाल शिवाजी मानकरी (वय 33, रा. तळवडे), नितीन किसन चव्हाण (वय 27, रा. इंदिरानगर, चिंचवड) अशी अटक आणि सुटका करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीविरोधात सोमवारी (दि. 10) देशभर भारत बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मनसेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समोर जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये घोषणाबाजी केली. तसेच वाहतुकीस अडथळा केला. यामुळे निगडीकडून पुण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. यावरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अटक करण्यात आली. सायंकाळी कायदेशीर जामीन मिळाल्यानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.