Pimpri: औद्योगिकनगरीत आज 134 नवे कोरोना रुग्ण; 74 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

134 new corona patients in the industrial city today; 74 discharged, three killed शहरातील एकूण 2,262 कोरोनाबाधितांपैकी 1326 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 39 जणांसह एकूण 65 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 896 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. शहराच्या विविध भागातील 128 आणि महापालिका हद्दीबाहेरील 6 अशा 134 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 74 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिलक्स चौक पिंपरीतील 55 वर्षीय महिला, नेहरुनगरमधील 39 वर्षीय पुरुष आणि आंबेगावमधील 78 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 2262 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील नव भारतनगर दापोडी, व्यंकटेश पार्क थेरगाव, अजंठानगर, कासारवाडी, विठ्ठलनगर नेहरुनगर, समर्थनगर नवी सांगवी, सिध्दार्थनगर दापोडी,इंदिरानगर चिंचवड, जाधव चाळ दापोडी, विवेकनगर आकुर्डी, नुर मोहल्ला दिघी, लांडेवाडी, मिलिंदनगर पिंपरी, तापकीरनगर काळेवाडी, हनुमान मंदिर रुपीनगर, अजमेरा कॉलनी मोरवाडी, सुखवानी कॅम्पस पिंपरी, पिंपरी कॉलनी, मोहननगर, सिध्दार्थनगर भोसरी, संभाजीनगर चिंचवड, दिघीनगर भोसरी, साईबाबानगर चिंचवड, कोकणे नगर काळेवाडी, धावडेवस्ती भोसरी, दिघी, बिजलीनगर, ताम्हाणेवस्ती चिखली,आदर्शनगर काळेवाडी, आबासाहेब पवारनगर सांगवी, ज्योतिबानगर काळेवाडी,पाटील नगर चिखली, कासारवाडी, दत्तमंदिर वाकड, नखातेनगर थेरगाव, अशोक थेटर पिंपरी, गुजरनगर थेरगाव,संत तुकारामनगर पिंपरी, विश्वशांती कॉलनी पिं.सौदागर, बौध्दनगर पिंपरी, मोरेवस्ती चिखली, विकासनगर किवळे, रामनगर रहाटणी, संत तुकाराम नगर भोसरी, भारतमातानगर दिघी, रामनगर चिंचवड, गांधीनगर पिंपरी, शांतीनगर भोसरी, केशवनगर चिंचवड, आकुर्डी, गुरुव्दार रोड वाल्हेकरवाडी, आनंदनगर चिंचवड, तानाजीनगर चिंचवड, कस्पटेवस्ती वाकड, पुर्णानगर चिंचवड, अष्टविनायक नगर काळेवाडी, मोरया पार्क पिंपळे गुरव, गुळवेवस्ती भोसरी, भोई आळी चिंचवड, पंचशिल नगर पिं. निलख, पाटोळे चाळ, प्रभातनगर पिंपळेगुरव, शिवगणेश कॉलनी दिघी परिसरातील 128 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामध्ये 74 पुरुष आणि 54 महिलांचा समावेश आहे. तर, केसरी नगर पुणे, तळेगाव, कोंढवा, कोथरुड, विजयनगर पुणे येथील 5 पुरुष आणि 1 महिलेलाही कोरोनाची बाधा झाली. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, नाशिक फाटा कासारवाडी, समर्थ नगर सांगवी, विठ्ठलनगर नेहरुनर, संततुकारामनगर पिंपरी, सिध्दार्थनगर दापोडी, साईबाबानगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, संत तुकाराम नगर भोसरी, खंडोबामाळ, जुनी सांगवी, संगमनगर जुनी सांगवी, कस्पटेवस्ती वाकड, मुळेनगर दिघी, सावंत नगर दिघी, डिल्क्स चौक पिंपरी, भारतनगर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, धावडेवस्ती भोसरी, पंचतारानगर आकुर्डी, पाटील फ्लोअर मिल दापोडी, शिंदेनगर जुनी सांगवी, अजिंक्य नगर काळेवाडी, गणेशनगर डांगे चौक, गवळीमाथा भोसरी, चिंचवड गाव, रहाटणी, वल्लभनगर पिंपरी, माहेननगर चिंचवड, तापकीर चौक काळेवाडी, वैभवनगर पिंपरी, लक्ष्मण नगर थेरगाव स्वरा रेसिडन्सी भोसरी, पंचशीलनगर पिंपळे निलख, पवार वस्ती दापोडी, जयभिमनगर दापोडी,गुलाबनगर दापोडी, विद्यानगर चिंचवड, तालेरा हॉस्पिटल जवळ चिंचवड, मोरेवस्ती चिखली, दिघी, भारतमाता चौक काळेवाडी, तुळजा भवानी कॉलनी थेरगाव, निराधारनगर थेरगाव, घरकुल चिखली, प्रेमप्रकाश टेपल पिंपरी, दापोडी कोंढवा, येरवडा, बोपोडी, कात्रज, केंद्र पाबळ, विजयनगर पुणे येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 74 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 2262 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1326 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 39 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 26 अशा 65 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 896 सक्रिय रुग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 335

# पॉझिटीव्ह रुग्ण – 134

#निगेटीव्ह रुग्ण – 111

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 478

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1411

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 197

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 2262

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 896

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 65

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 1326

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 23829

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 72843

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.