Pimpri: शिस्तभंग, हलगर्जीपणा, गैरवर्तन करणा-या 147 महापालिका अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कामात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा, शिस्तभंग, गैरवर्तन, विना परवाना गैरहजर राहणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 147 अधिकारी, कर्मचा-यांवर मागील वर्षभरात कारवाई करण्यात आली आहे. वेतनवाढ स्थगिती, दंडात्मक कारवाई, खातेनिहाय चौकशी, सक्त ताकीद असे कारवाईचे स्वरुप असून त्यामध्ये बड्या अधिका-यांचा देखील समावेश आहे.

महापालिका सेवेत कार्यरत असताना कामात हलगर्जीपणा, विनापरवाना गैरहजर राहणे. कामातील निष्काळजीपणा, अधिकाराचा गैरवापर, लाचखोर, आर्थिक अपहार करणे, फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई केली जाते. महापालिकेने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान 147 अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई केली आहे.

त्यामध्ये 17 जणांवर दंडात्मक शास्तीची कारवाई केली आहे. 18 जणांची खातेनिहाय चौकशी, पदानवत करुन 30 जणांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली आहे. 59 जणांची वेतनवाढ स्थगित केली आहे. दोघांचे सेवानिलंबन करुन खातेनिहाय चौकशी करण्यात आली आहे. 12 जणांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तर, दोघांची सेवा समाप्त केली असून दोघांना पदावनत करण्यात आले आहे.

  • ‘या’ बड्या अधिका-यांवर केली कारवाई!
    सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, उपशहर अभियंता रामदास तांबे, नगररचना विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, विजयकुमार काळे, संजय खाबडे, कार्यालयीन अधिक्षक अमर तेजवाणी, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंखे, प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे या बड्या अधिका-यांसह एकूण 147 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
HB_POST_END_FTR-A2
You might also like