Pimpri: मावळसाठी 15 उमेदवारांचे अर्ज दाखल; महायुती, महाआघाडीचे उमेदवार उद्या भरणार अर्ज

मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात आजपर्यंत 15 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार उद्या (दि.९, मंगळवारी) रॅली काढून अर्ज भरणार आहेत.

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 2 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. 6 एप्रिलपर्यंत केवळ 7 उमेदवाराचे अर्ज आले होते. आज (सोमवारी) एकाच दिवसात 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वचिंत बहुजन आघाडीचे राजाराम नारायण पाटील यांनी शक्‍ती प्रदर्शन करीत आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यासोबतच बहुजन समाज पार्टीचे संजय किसन कानडे, क्रांतीकारी जयहिंद सेनेचे आप्पा उर्फ जगदीश शामराव सोनवणे, अपक्ष म्हणून अमृता अभिजीत आपटे, भारतीय नवजवान सेनेचे प्रकाश भिवाजी महाडिक, अपक्ष म्हणून धर्मराज यशवंतराव तंतरपाळे, प्रकाश गणपत देशमुख, राकेश प्रभाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.