Pimpri: शहरात 15 दिवसांचा कठोर लॉकडाउन करा, तरच परिस्थिती नियंत्रणात येईल – भाऊसाहेब भोईर

15 days of severe lockdown in the city, only then the situation will be under control - Bhausaheb Bhoir

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण वाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाउले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी किमान 7 ते 15 दिवसांचा कठोर लॉकडाऊन करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.

लॉकडाउन केले तरच किमान परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहेत. त्यात नगरसेवक भोईर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना या आजाराचे रुग्ण वाढण्याचा वेग दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे.

ही चिंताजनक बाब आहे. महापालिका यंत्रणेची संपूर्ण क्षमता पाहता हि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही कठोर पाऊले उचलणे अत्यंत आवश्यक आहेत.

त्यासाठी शहरात किमान 7 ते 15 दिवसांचा कठोर लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. तरच किमान परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कायदेशीर बाबी विचारात घेऊन या निर्णयाचा लवकरात लवकर विचार करावा अशी विनंती भोईर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.