Pimpri: महापालिकेच्या सर्वेक्षणात आढळल्या नवीन 15 हजार मालमत्ता!; 15 दिवसांत केले सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने शहरातील बिगरनोंद, क्षेत्रफळात वाढ आणि वापरात बदल झालेल्या मिळकतींच्या केलेल्या सर्वेक्षणात 14 हजार 928 नवीन मालमत्ता आढळल्या आहेत. यामध्ये दहा हजार 308 नवीन मालमत्ता, 3489 वाढीव मालमत्ता, 483 वापरात बदल केलेल्या मालमत्ता आणि जुनी पाडून नवीन बांधलेल्या 648 मालमत्ता आढळल्या आहेत. याबाबतची माहिती कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच लाख सहा हजार 927 मिळकती आहेत. या मिळकतींना महापालिकेतर्फे कर आकारणी केली जाते. 16 कर संकलन विभागीय कार्यालयातर्फे कर वसूल केला जातो. शहरातील अनेक मिळकतींची नोंद झाली नाही. मिळकतींच्या क्षेत्रफळात, वापरात बदल झाले आहेत. अशा मिळकतींची नोंद झाली नसल्याने महापालिकेने मालमत्तांचे सर्व्हेक्षण केले. 15 ते 30 जून दरम्यानच्या काळात सर्व्हेक्षण करण्यात आले. क्षेत्रीय अधिकारी, कार्यालयाचे प्रशासन अधिकारी, सहाय्यक मंडलाधिकारी आणि गटप्रमुख यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन हे सर्व्हेक्षण करण्यात आले.

  • मोशी परिसरात सर्वाधिक म्हणजेच 3294 नवीन मालमत्ता आढळल्या असून सर्वात कमी निगडी प्राधिकरणात 17 आढळल्या आहेत. वाढीव बांधकाम केलेल्या सर्वाधिक मालमत्ता मनपा भवन परिसरात 757 आढळल्या असून सर्वात कमी च-होलीत केवळ तीन वाढीव मालमत्ता आढळल्या आहेत.

वापरात बदल केलेल्या सर्वाधिक मोशीत 113 मालमत्ता आढळल्या असून सर्वात कमी च-होलीत केवळ एक बदल केलेली मालमत्ता आढळली आहे. तर, जुनी पाडून नवीन मालमत्तांमध्ये सर्वाधिक फुगेवाडी-दापोडीत 270 मालमत्ता आढळल्या आहेत. तर, आकुर्डी, चिंचवड, सांगवी, चिखली आणि किवळे परिसरात एकही जुनी पाडून नवीन बांधलेली मालमत्ता आढळलेली नाही.

  • 16 विभागीय कर संकलन कार्यालयानिहाय ‘अशा’ आहेत नवीन, वाढीव, वापरात बदल अन्‌ जुनी पाडून नवीन बांधलेल्या मालमत्ता!

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.