Pimpri: सांगवीतील 16 वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण; ‘हा’ परिसर सील

16 year old girl test positive to coronavirus in Sangvi, कोरोना बाधितांचा आकडा 169 वर; 76 जण कोरोनामुक्त, सात जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी भागातील एका 16 वर्षाच्या मुलीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, पुण्यातील ताडीवाला रोड येथील पण, वायसीएममध्ये दाखल असलेल्या सहा वर्षाच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, आज सकाळाची ताम्हाणेवस्ती, मोशीतील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात पाच नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने गुरुवारी (दि. 7) 176 कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही आणि ‘नारी’कडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत.

त्यामध्ये सांगवीतील 16 वर्षाच्या मुलगी आणि पुण्यातील ताडीवाला रोड येथील पण, वायसीएममध्ये दाखल असलेल्या सहा वर्षाच्या मुलाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महापालिका रुग्णालयात 68 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत शहरातील आणि शहराबाहेरील पण, वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा 169 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 76 जण कोरोनामुक्त झाले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे.

आजचा वैद्यकीय अहवाल!
# दाखल झालेले संशयित रुग्ण – 104

# पॉझिटीव्ह रुग्ण – 05

# निगेटीव्ह रुग्ण – 241

# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 103

# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 182

# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 185

# आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 169

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 68

# शहरातील कोरोना बाधित आठ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 7

# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 76

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 21671

# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 62059

  • ताम्हाणे वस्तीतील हा परिसर सील!
    ताम्हाणे वस्ती परिसरात आज कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ताम्हाणे वस्ती-त्रिवेणीनगर (मोरया, विनायक मेडिकल-श्री महालक्ष्मी ट्रेडर्स-श्री स्वामी समर्थ स्क्रॅक समोर-त्रिवेणीनगर रोड-श्रीराम फॅब्रिकेशन वर्कस्-हनुमान मेडिकल-म्हेत्रेवस्ती उद्यान-जलशुद्धीकरण केंद्र हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे.
  • या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.