Pimpri: पादचारी महिलेची सोन्याची चेन हिसकावली

एमपीसी न्यूज – पायी जाणा-या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी18 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेली. हा प्रकार पिंपरीत गुरूवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडला.

याप्रकरणी 59 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला गुरूवारी सायंकाळी पिंपरीतील रॉयल वर्ल्ड शाळेजवळून पायी जात होत्या. दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 18 हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारून तोडून नेली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.