Pimpri Corona Update : पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे 169 नवीन रुग्ण; 112 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 13) 169 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 112 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 94 हजार 437 एवढी झाली आहे. तर आजवर 91 हजार 114 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला.

मृत्यू झालेले शहरातील रुग्ण पिंपरी (47 वर्ष), किवळे (46 वर्ष) येथील आहेत.

आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 1 हजार 718 तर शहराच्या बाहेरील 695 रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे

शहरात 824 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर 751 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 88 रुग्णांवर शहराच्या बाहेरील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 1 हजार 130 जणांचे चाचणी अहवाल प्रतीक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.