Pimpri : पीएमपीएलच्या 16 व्या वर्धापदिनाचे आयोजन

एमपीसी न्यूज- पुणे महानगर परिवहन महामंडळ ( पीएमपीएल ) चा 16 वा वर्धापनदिन 19 एप्रिलला आयोजित करण्यात आला (Pimpri )आहे. त्या अंतर्गत पुणे शहरातील पंधरा डेपोमधील व्यवस्था , कामकाज व इतर गोष्टीं विचारात घेऊन समितीकडून 19 एपिल पर्यंत पुणे शहरातील स्वच्छ असणाऱ्या डेपोला पहीले व दुसरे पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती  प्रशासनाकडून देण्यात आली.

शहरात पीएमपीएलच्या बसगाड्यांना छोटयांपासून मोठ्याची पसंती मिळते.पीएमपीएलचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून समिती पथाकाकडून बस स्टाॅप, बस स्टॅंड,  त्यामध्ये शहरातील पंधरा डेपोची पाहणी करण्यात येणार आहे.

Pune News : 30 लाखाच्या खंडणीसाठी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला धमकीचे फोन; पुण्यात गुन्हा दाखल

डेपोमधील स्वच्छता, बसमधील बोर्ड, प्रवाशांमध्ये जागृता निमार्ण करणे, जलद गतीने वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण, प्रवाशांसोबत सौजन्यांनी वागणे, या सर्व बाबीवर लक्ष घालून स्वच्छ असणाऱ्या डेपो पहीले व दुसरे परितोषिक देण्यात येणार आहे.तसेच डेपो अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी क्रिकेट ,कबड्डी ,व्हॉलीबॉल ,बॅटमिंटन, सामने ठेवण्यात आले आहेत. या खेळामधील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.