Pimpri : निगडी येथे 13 जानेवारीला रनेथॉन ऑफ होप 2019 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे तर्फे 13 जानेवारी (रविवारी) निगडी प्राधिकरण येथे नवव्या रनेथॉन ऑफ होप 2019 या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अमित घोष, अण्णारे बिरादार, जगमोहन सिंग, विजय काळभोर, रवी राजापूरकर आदी उपस्थित होते.
या मॅरेथॉनला महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनने राज्य स्तरीय स्पर्धा म्हणून मान्यता दिली आहे. या स्पर्धेची सुरुवात महापौर बांगला प्लॉट भेळ चौकाजवळून सकाळी पावणे सहा वाजता होणार आहे. ही स्पर्धा चॅरिटी आणि स्पर्धा या दोघांचा संगम असून त्यात एकाच दिवशी 12 वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यती होणार आहेत. मुले-मुली तसेच स्त्री-पुरुष अशा चार वेगवेगळ्या वयोगटात स्पर्धा पार पडेल.

निगडी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी म्हणाले, “अशा प्रकारच्या लोकप्रिय आणि सहभागाच्या दृष्टीने महत्वाच्या स्पर्धेचे आयोजन करताना अतिशय अभिमान वाटत आहे. खेळाला प्रोत्साहन देऊन फिटनेस बाबत जागृती यासह वेगवेगळ्या सोशल सर्व्हिस प्रोजेक्टसाठी मदतनिधी उभारणे हा आमचा उद्देश आहे.”
या स्पर्धेमध्ये 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या स्त्री व पुरुषांना पाच किलोमीटर, 10 किलोमीटर व 21 किलोमीटर यामध्ये खुला सहभाग आहे. या वर्षी 45 वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या स्पर्धकांना वेगळी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. धर्मादाय स्पर्धा दोन किलोमीटरची असून कंपन्यांसाठी स्पर्धा पाच किलोमीटरची आहे. या स्पर्धेत एकूण 4 लाख 15 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे प्रायोजकत्व सिस्का एलईडी, सँडविक एशिया, टाटा मोटर्स, एसकेएफ इंडिया, इमरसन, एनप्रो, टीजेएसबी, हॉटेल डबल ट्री हिल्टन व थरमॅक्स आदींनी स्वीकारले आहे. इच्छुक स्पर्धकांना सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन (www.runathon.org) नोंदणी करावी लागणार आहे. तसेच श्रीरंग खापर्डे (9890505194), विजय काळभोर (9881371893), डॉ. प्रवीण घाणेगावकर (9823882251).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.